AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे निष्ठावंत नेते मनोहर जोशी यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेनेचे निष्ठावंत नेते मनोहर जोशी यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Feb 23, 2024 | 10:41 AM
Share

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते आणि काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज दुखःद निधन झालं आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं थांबवल्याचे समोर आले. दरम्यान अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. मनोहर जोशी यांचं दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यावेळी त्यांचं निधन झालं.

Published on: Feb 23, 2024 10:41 AM