Eknath Shinde Video : ‘एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी…’, डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नही सुनता... मला हलक्यात घेऊ नका. बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांचं काय झालं तुम्हाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.
एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नही सुनता…असं म्हणत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले. ‘मी साधा कार्यकर्ता आहे. मला हलक्यात घेऊ नका. बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांचं काय झालं तुम्हाला माहीत आहे’, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं. पुढे ते असेही म्हणाले. ‘मी तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो. मी बाळासाहेबांच्या चरणी विजय अर्पण करायला आलो आहे. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं. तुम्हीही शिवसेना, बाळासाहेब आणि धनुष्यबाणावर प्रेम केलं. आशीर्वाद दिले. शिवसेनेच्या विजयात कोकणी माणसाचा मोठा वाटा आहे’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. रत्नागिरीत आयोजित केलेल्या आभार सभेत ते बोलत होते. एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, असं काही लोक म्हणाले. मी म्हणालो, एकही आमदार पडू देणार नाही. आम्ही २०० पेक्षा जास्त जास्त निवडून आणणार. आम्ही या निवडणुकीत २३२ आमदार निवडून आणले. एक लँडस्लाईड मँडेट मिळालं. आपण फक्त ८० जागा लढवल्या. आणि ६० आमदार निवडून आणले. आणि महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. १५ लाख मते आपल्याला जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? असा सवाल करत बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार कोण हे जनतेने ठरवलं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
