Deepak Kesarkar |Ravindra Chavan यांनी कशाची जादू केली हे सर्वांना माहित - दिपक केसरकर

Deepak Kesarkar |Ravindra Chavan यांनी कशाची जादू केली हे सर्वांना माहित – दिपक केसरकर

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 7:25 PM

नारायण राणे हरत असल्याचे जेव्हा भाजपाच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्याठीकाणी रविंद्र चव्हाण यांना पाठवले. रविंद्र चव्हाण यांनी कशाची जादू केली हे आपल्या सर्वांनाच माहित  आहे. आतापर्यंत माझा लढा हा दहशतवाद्यांविरोधात होता.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये थेट लढत रंगल्याचे पहायाला मिळाले. नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने आल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र या निवडणुकीत नारायण राणे यांनी बाजी मारली. आता यावरून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. नारायण राणे हरत असल्याचे जेव्हा भाजपाच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्याठीकाणी रविंद्र चव्हाण यांना पाठवले. रविंद्र चव्हाण यांनी कशाची जादू केली हे आपल्या सर्वांनाच माहित  आहे. आतापर्यंत माझा लढा हा दहशतवाद्यांविरोधात होता. आता निवडणुकीमध्ये पैशांचे वाटप करणाऱ्यांविरोधात असेल, असे म्हणत केसरकर यांनी या निवडणुकीमध्ये पैशांचे वाटप झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील केला आहे.