Uday Samant Mobile stolen Video : जिथे कायदे बनतात तिथेच चोरी! मंत्री उदय सामंतांच्या फोनची विधानभवनाच्या लॉबीतून चोरी
ज्या ठिकाणी कायदे तयार होतात त्याच विधान भवनातूनच थेट एखाद्या मंत्र्याचा मोबाईल फोन चोरीला जाणं ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मंत्री उदय सामंत यांचा फोन चोरीला...
मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अशातच विधानभवनातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधान भवनाच्या लॉबीतून शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी कायदे तयार होतात त्याच विधान भवनातूनच थेट एखाद्या मंत्र्याचा मोबाईल फोन चोरीला जाणं ही धक्कादायक बाब आहे. ज्या ठिकाणी विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे असतात. त्यासोबत या ठिकाणी सर्व नेते, मंत्री हजर असतात. अशा ठिकाणी असे प्रकार घडणं हे धक्कादायक मानलं जातं आहे. अशातच उदय सामंत हे मंत्री असून त्यांच्याच फोन विधानभवनातून चोरीला गेल्याने पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असून सर्वसामान्याचं काय होणार? असा सवाल यानिमित्ताने सध्या उपस्थित होतोय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

