Sanjay Raut : ‘सिल्व्हर ओक’ बैठकीवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
काल रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा झाली. भविष्यातील घडामोडींवरही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे संजय राऊत म्हणाले
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’वर भेट झाली. ही भेट ठाकरे यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जात घेतल्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. यादरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याविषयी स्पष्टीकरण दिल आहे. त्यांनी, काल रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा झाली. भविष्यातील घडामोडींवरही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या असेही ते म्हणाले. तर काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल राव हे सुद्धा ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
