Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम…; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्षचिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी ठाकरे गटाने बहुमत चाचणीला सामोरे न जाणे, राणा खटल्याचा चुकीचा अर्थ आणि अपात्रतेचा क्रम यावर युक्तिवाद केला. तत्कालीन अध्यक्षांचा निर्णय वस्तुस्थितीवर आधारित असावा, असे कौल यांनी म्हटले.
गेल्या पंधरा दिवसांनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात आपला युक्तिवाद मांडला. ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली नाही, हा मुख्य मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आधी पक्षातील फूट, नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही, असे कौल यांनी युक्तिवादादरम्यान स्पष्ट केले.
कौल यांनी राणा आणि सुभाष देसाई या महत्त्वाच्या खटल्यांचा दाखला दिला. राणा खटल्याचा अर्थ चुकीचा लावला जात असल्याचा दावा त्यांनी केला. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच असतो, हे सुभाष देसाई खटल्यातील तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निकालाचा संदर्भ देऊन कौल यांनी सांगितले. व्हिप काढण्याचा अधिकार राजकीय पक्षाचाच असतो, यावरही त्यांनी भर दिला. अपात्रता याचिका दाखल झाली तेव्हाच्या वस्तुस्थितीनुसार अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे राणा प्रकरणात स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
Published on: Oct 06, 2026 04:29 PM
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?

