पेगाससचा मुद्दा महत्त्वाचा, त्यावर चर्चा होणे गरजेचे | Arvind Sawant

इंधन दरवाढ आणि महागाईसारखा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कधी काळी टू जी च्या मुद्दयावर भाजपने सुद्धा अशाच पद्धतीने कामकाज होऊ दिले नाही, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : पेगाससचा मुद्दा हा महत्वाचा आहे. त्यावर सरकारने चर्चा करण्याची गरज आहे. इंधन दरवाढ आणि महागाईसारखा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कधी काळी टू जी च्या मुद्दयावर भाजपने सुद्धा अशाच पद्धतीने कामकाज होऊ दिले नाही, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. न्यूज पोर्टल ‘द वायर’च्या दाव्यानुसार, 2017 ते 2019 ह्या दोन वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारनं जवळपास 300 भारतीय नागरिकांची हेरगिरी केली तीही ते वापरत असलेल्या फोनच्या माध्यमातून. यात पत्रकार आहेत, विरोधी पक्षाचे नेते आहेत, वकिल आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योगपती आहेत आणि जजेसही आहेत. पेगासस नावाचं स्पायवेयर आहे त्याच्या माध्यमातून फोन हॅक करुन पाळत ठेवली गेलीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI