Shiv Sena Symbol : शिवसेना कोणाची? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या सूनवणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांसह पक्ष सोडला आणि महायुतीत सामील झाले. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. हा वाद निवडणूक आयोगापुढे गेला, जिथे आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. या चिन्हाखाली शिंदे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या. मात्र, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यापासून रोखण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणावर आज रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

