Shrikant Shinde : मुंबई मनपा निवडणुकीत सर्व निर्णय श्रीकांत शिंदे घेणार
Mumbai Municipal Corporation Elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात मुंबई पालिका निवडणुकीचे शिंदे गटाचे सर्व निर्णय आता श्रीकांत शिंदे घेणार आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत सर्वांचं लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गट शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व व नियोज असणार आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. उद्याच्या शिवसेना मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांची राजकारण आणि विकासासंदर्भात जाहीर मुलाखत होणार असल्याची माहीत देखील समोर येत आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

