नाशिक, सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंदी सक्तीविरोधात आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे.
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी 5 जुलैला मुंबई भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. आज शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची होळी करण्यात आली. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे. मनसेचे नेते देखील यावेळी आंदोलनाला उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्यात नाशिक, सोलापूरमध्ये देखील सरकारच्या हिंदी सक्तीच्या प्रतीकात्मक जीआरची होळी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

