Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही? सेनेच्या नेत्याचं मोठं विधान
Bhaskar Jadhav On Santosh Deshmukh Case : बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होणार नाही, त्यांचं संरक्षण सरकारकडूनच केलं जाईल असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही. त्यांचे सगळे मारेकरी सापडणार नाहीत, असं शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे. आज विधिमंडळ अधिवेशनात जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, मी फार आधीच यावर बोललो आहे. संतोष देशमुख यांचे सगळे मारेकरी कधीही सापडणार नाही. त्यांना शिक्षा सुद्धा होणार नाही. आज कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या चौकशा लाऊन आरोपींना संरक्षण दिल्याचं काम केलं जाणार आहे. आता तेच सुरू आहे. कोणीतरी दूसरा एखादा आरोपी असेल, तर त्याच्या घराची तोडफोड होते, त्याच्या घरावर बुलडोजर फिरवलं जातं. पण वाल्मिक कराड आणि फरार असलेले आरोपी आणि जे सापडले आहे त्यांच्या मालमत्तेवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणजेच संतोष देशमुख यांची हत्या ही सरकार आणि प्रशासनासाठी फार मोठी घटना आहे, असं वाटत नाही हेच यातून दिसतं असं यावेळी भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

