Dhananjay Munde : मी कधीच कोणावर खोटे आरोप केले नाही, पण ..; बीड अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं विधान
Dhananjay Munde On Beed Crime Case : बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे.
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे. काल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. तसंच यावेळी मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, जेव्हा माझ्यावर मीडियाचं ट्रायल सुरू होतं. माझा त्या घटनेत कोणताही संबंध नसताना ते बोलत होते, तरीही मी त्यांच्या कोणाच्याही विरोधात बोललो नाही. सत्य काय आहे हे मला माहिती आहे. मी कोणावरही बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही. 25 वर्ष मी राजकरणात आहे पण कोणावरही खोटे आरोप केले नाही. पण या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं

देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका

फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?

काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
