Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधाना हिच्या विवाहाला काहीच तास बाकी अन् वडिलांना हृदयविकाराचा झटका
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. सांगलीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा आज सांगलीत विवाह संपन्न होणार होता. मात्र विवाह सोहळ्याच्या काहीच तास आधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी माहिती समोर आली. श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
स्मृती मानधनाचा विवाह संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी आज पार पडणार होता. मात्र, वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्मृतीने हा सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत विवाह सोहळा न करण्याचा स्मृतीचा निश्चय आहे. कुटुंबासाठी हा एक मोठा प्रसंग असून, सर्वजण श्रीनिवास मानधना यांच्या लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

