इंदुरीकर महाराजांच्या मानधनावरील टीकेला गौतमी पाटीलचं एका वाक्यात उत्तर; म्हणाली, ते महाराज…
Gautami Patil Dance : आज मी पुन्हा उभी राहीलीय. ती फक्त प्रेक्षकांमुळेच. मला कोणत्याही गोष्टी त्यांनी जाणवू दिल्या नाहीत.महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सपोर्ट केल्यामुळे मी जिद्दीने अडचणी च्या काळात उभा राहिलीय, असं गौतमी पाटील म्हणाली.
सोलापूर : नृत्यांगणा गौतमी पाटीलने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या टीकेला पहिल्यांदाच tv9 वर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “ते महाराज आहेत. मी काय बोलणार त्यांच्याविषयी… फक्त गैरसमज नका करु. महाराजांचा गैरसमज झाला आहे. माझं मानधन एवढं नाही. प्रेक्षकांनीही हे ध्यानात घ्यावं. महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं टीका केली तरी माझं काम सुरु आहे. मला काही अडचण नाही. कारण माझं मला माहिती आहे. मी कशी आहे. मी मानधन किती घेते ते. मी तीन गाण्याला तीन लाख घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केलं नसतं, असं गौतमी पाटील म्हणाली आहे. माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहुन इन्जॉय करतात. आम्ही 11 मुली आणी अन्य अश्या 20 जणांची आमची टीम कार्यक्रमात असते. इतकी मोठ्या गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना, असंही गौतमी म्हणाली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

