Special Report | शरद पवारांची मोठं वक्तव्य, नव्या आघाडीचा कोणता प्लॅन?-TV9
40 मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल.
एकाच वेळी तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली…ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार केलं. आणि एकनाथ शिंदेंच्या गटात आले. मात्र पवार पुन्हा वेगळी खेळी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास वेगळं चित्र पाहायला मिळेल असं वक्तव्य पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत केलंय. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत. अनेकजण बोललेत की, 40 मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली

