Special Report | तळीये गावात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रेश हृदय पिळवटून टाकणारा होता. कुणी आपली आई, कुणी बहिण, कुणी भाऊ, कुणी अख्खं कुटुंब गमावलं आहे. तळीये गावातील ग्रामस्थांच्या वेदना शब्दात सांगता येणाऱ्या नाहीत.

डोंगर काळ म्हणून कोसळला आणि महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रेश हृदय पिळवटून टाकणारा होता. कुणी आपली आई, कुणी बहिण, कुणी भाऊ, कुणी अख्खं कुटुंब गमावलं आहे. तळीये गावातील ग्रामस्थांच्या वेदना शब्दात सांगता येणाऱ्या नाहीत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI