Ishaq Dar on Indus Waters Treaty : …तर अॅक्ट ऑफ वॉर समजलं जाईल, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
जम्मू आणि काश्मीरमधील तीन प्रमुख नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी धोका आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांनीही म्हटले आहे की, जर हे पाणी संकट सोडवले नाही तर ते युद्ध मानले जाईल.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला असून मोठं नुकसान पाकिस्तानचं झाल्याचे पाहायला मिळालं. ऑपरेश सिंदूरची धडकी भरलेल्या पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर यांनी अमेरिका आणि चीनला संघर्ष थांबवण्याची विनंती करत होते. भारताने संघर्ष थांबवण्याची ही विनंती ऐकली आहे. असे असतानाही पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार पुन्हा एकदा धमक्या देत आहेत. मोहम्मद इशाक दार यांनी एका अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना भारताला ही धमकी दिली. मोहम्मद इशाक दार यांनी दिलेल्या धमक्यांवरून हे स्पष्ट होते की पाकिस्तान सरकारला कोणत्याही परिस्थितीत भारतासोबत शांतता नको आहे. त्यांच्यात युद्धाची खुमखुमी कायम आहे. अशातच सिंधू जल करारावरुन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा एकदा बरळल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधू जल करार थांबवणं अॅक्ट ऑफ वॉर समजलं जाईल, असा इशारा दार यानी दिलाय. इतकंच नाहीतर जम्मू आणि काश्मीर हे भारत पाकिस्तान या देशातील होणाऱ्या वादाचं मूळ कारण असल्याचेही इशाक दार याने म्हटलं आहे.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?

