“नव्या संसदेच्या उद्घाटनाला जायचा संजय राऊत यांना अधिकार नाही”, भाजपच्या बड्या नेत्याची टीका
संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे.या उद्घाटनावरून सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत यावर बहिष्कार टाकला आहे. त्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संसद भवनाच्या उद्घाटनावरून सुजय विखेंचा संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
अहमदनगर : संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे.या उद्घाटनावरून सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत यावर बहिष्कार टाकला आहे. त्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संसद भवनाच्या उद्घाटनावरून सुजय विखेंचा संजय राऊत यांना टोला लगावला आहे. “संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला कुणी जावो न जावो, पण संजय राऊतांना तिथं जायचा अधिकार मुळीच नाही.ज्या लोकांच्या मतावर संजय राऊत खासदार झाले ते त्यांना सोडून गेले.त्यामुळे संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. शिवसेनेचे आमदार-खासदार झाले त्यांना गेल्या एक वर्षापासून शिव्या देत आहे.त्यामुळे त्यांनी संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये”, असं विखे पाटील म्हणाले आहेत.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत

