पावसाचा फटका, वाहतूक कोंडी यासह पहा भरतीची बातमी सुपरफास्ट 50 न्यूज 

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 15, 2022 | 5:22 PM

राज्यात मोठी पोलीस भरती निघण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. राज्यात तब्बल 11, 443 पदांसाठी मोठी पोलिस भरती निघणार आहे. तर यासाठीचा शासन आदेश देखिल काढण्यात आला आहे.

लोकांच्या व्यथा ही ऐकाव्या लागत असल्याने भाषण थोडक्यात उरकण्याची वेळ शिंदे-भाजप सरकारमधील एका मंत्र्यांवर आली आहे. औरंगाबादमध्ये सहकार मंत्री अतुल सावे यांचे भाषण सुरू असताना ही घटना घडली. यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या एका जेष्ठ शेतकऱ्याने कारखान्यासंदर्भात आपल्या व्यथा मांडल्याने सहकार मंत्री सावे यांना त्यांचे भाषण उरकावे लागले. तर शिंदे गटाचे फायर स्पोक पर्सन आमदार शहाजीबापू पाटलांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. कोल्हापूर-सांगली महामार्गावरील तारदाळ फाट्यावर त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. राज्यात मोठी पोलीस भरती निघण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. राज्यात तब्बल 11, 443 पदांसाठी मोठी पोलिस भरती निघणार आहे. तर यासाठीचा शासन आदेश देखिल काढण्यात आला आहे. तर परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात शेतीचे मोठं नुकसान केलं आहे. कोल्हापूरच्या हाचकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील ऊस, भात, भुईमूग आणि सोयाबिन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुसकान झालं आहे. तर परभणीत देखिल चित्र काहीसे असचं आहे. येथेही परतीच्या पावसाने तोंडाला आलेला घास पावसामुळे हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI