SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 29 July 2021

बुधवारी 28 जुलैला नव्याने काढण्यात आलेल्या आदेशात आष्टी, पाटोदा, शिरुर आणि गेवराई या चार तालुक्यात सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत मार्केट सुरु ठेवता येणार आहे. यानंतर फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. यासह शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असेल. कडक निर्बंध काळात नियम डावलणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

बीड जिल्ह्यात (Beed corona) कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. आष्टी, पाटोदा, शिरुर, गेवराई या चार तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यापूर्वीच यातील काही तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

बुधवारी 28 जुलैला नव्याने काढण्यात आलेल्या आदेशात आष्टी, पाटोदा, शिरुर आणि गेवराई या चार तालुक्यात सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत मार्केट सुरु ठेवता येणार आहे. यानंतर फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. यासह शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विकेंड लॉकडाऊन असेल. कडक निर्बंध काळात नियम डावलणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, बीडच्या ग्रामीण भागात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच आष्टी, पाटोदा, शिरुर आणि गेवराई या चार तालुक्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI