AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 6 July 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 6 July 2021

| Updated on: Jul 06, 2021 | 8:47 AM
Share

संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कराड शहरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी कराड पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. मंदिर प्रवेश, मास्क न लावणे आणि कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कराड शहरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी कराड पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. मंदिर प्रवेश, मास्क न लावणे आणि कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईच्या विरोधात कराडमध्ये रॅली काढली. बंडातात्या कराडकर यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत पायी दिंडीला जाण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांना कराडमध्ये त्यांच्या आश्रमशाळेत स्थानबद्ध करण्यात आलंय. या कारवाईच्या विरोधात आणि पायी वारीच्या समर्थनासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने भिडे गुरुजी यांचे नेतृत्वाखाली रॅली काढली. तसेच आपल्या मागण्यांचं निवेदन कराड तहसिलदार यांना दिलं. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह 70 ते 80 धारकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. 5 जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन त्यांनी कराड शहरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली. मंदीर प्रवेश बंदी असतानाही मंदीर उघडून मंदिरात प्रवेश केला. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.