AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 6 October 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 6 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 8:48 AM
Share

जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती.

राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासा भाजपला केवळ 2 जागांची गरज आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे यांच्या लढतीकडे लक्ष लागलं आहे. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत आहेत. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. यावेळी त्यांना मविआकडून कडवं आव्हान देण्यात आलंय.

जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार असा दावा भाजप उमेदवार आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांनी केलाय.

Published on: Oct 06, 2021 08:48 AM