मराठा समाजाचा ओबीसीत समावेश, ओबीसी प्रमाणपत्राच्या मागणी मागणीसाठी संभाजीनगरात विद्यार्थ्यांचं आंदोलन
विद्यार्थ्यांकडून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नुकताच दिला. मराठा आरक्षण (maratha reservation) रद्द केल्यामुळे मराठा समाजाला हा मोठा धक्का बसला आहे. यावरून मराठा समाज आक्रमक दिसत आहे. यादरम्यान आता बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Babasaheb Ambedkar Marathwada University) मराठा आरक्षणावरून विद्यार्थीही रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांकडून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून प्रशासकीय इमारतीपर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

