Supriya Sule | एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल

Supriya Sule | एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल

| Updated on: Mar 16, 2026 | 11:55 AM

इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गॅसच्या तुटवड्यामुळे व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या अभावामुळे काही ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.

इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गॅसच्या तुटवड्यामुळे व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या अभावामुळे काही ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. तसेच घरगुती गॅससाठी अनेक शहरांमध्ये नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात गॅस सिलेंडरची कमतरता आणि तुटवडा असताना भारत सरकार हे वास्तव का कबूल करत नाही? तसेच या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी ठोस अ‍ॅक्शन प्लॅन का तयार केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा भारतात कोलॅप्स झाली असल्याचेही सुळे यांनी म्हटले. या गंभीर विषयावर तातडीने संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी आम्ही करत आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Published on: Mar 16, 2026 11:55 AM
Follow Us