सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड; म्हणाल्या, लग्नाची यादीही…

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांची चांगलीच पोलखोल केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या वसुलीचीच यादी वाचून दाखवली. पोलिसांनीच जर अशा पद्धतीने वसुली करण्यास सुरुवात केली तर कायदा सुव्यवस्था कशी राहील? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड; म्हणाल्या, लग्नाची यादीही...
| Updated on: May 27, 2024 | 5:41 PM

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन पोलीस आणि अधिकाऱ्यांची पोलखोल केली. अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचले पोलिसांचे रेट कार्ड. कुठून कुठून कशी वसूली केली जाते याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. ही यादी खूप मोठी आहे. लग्नाच्या आहेराची यादीही एवढी मोठी नसते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं. तेव्हा महसूल मंत्री शंभुराज देसाई यांनी आमच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरण्याची भाषा केली. आता काय म्हणणं आहे? आम्ही या प्रकरणाचे पुरावे दिले आहेत, काय करणार आहात? डॉ. तावरेंना ललित पाटील प्रकरणात अटक करायला हवी होती. पण त्यांना आता एका लल्लूपंजू प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांना तेव्हाच अटक का केली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Follow us
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?.
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय.
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण...
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण....
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे.
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल.
फडणवीसांच सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून विधान,जरांगेंची मागणी पूर्ण होणार?
फडणवीसांच सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून विधान,जरांगेंची मागणी पूर्ण होणार?.