Chhagan Bhujbal : ‘अजितदादा भाजपाला आताच सांगून टाका, की…’, छगन भुजबळांच मोठ वक्तव्य, VIDEO

Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. या दरम्यान छगन भुजबळ यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. त्याआधी त्यांनी पक्षप्रमुख अजित पवार यांच्यासमोर एका मुद्दा मांडलाय. आता यावर भाजपाची भूमिका काय? हे महत्त्वाच ठरणार आहे.

Chhagan Bhujbal : 'अजितदादा भाजपाला आताच सांगून टाका, की...', छगन भुजबळांच मोठ वक्तव्य, VIDEO
NCP leader Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 1:15 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व 48 जागांवर मतदान पूर्ण झालय. पाचव्या टप्प्यात राज्यातील सर्व जागांवर मतदान संपलं. आता सर्व लक्ष 4 जूनच्या निवडणूक निकालाकडे लागल आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत आज महत्त्वाची बैठक सुरु आहे. यावेळी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर महत्त्वाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या होत्या.

2019 मध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता. कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे, त्या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला त्या आधारावर कमी जागा आल्या होत्या. म्हणून आज मुंबईत सुरु असलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर मोठी मागणी केली आहे. लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात खटपट होता कामा नये, असं छगन भुजबळ म्हणाले. “आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले. ‘त्यांना आत्ताच सांगून टाका’

“लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, आम्हाला एवढ्या जागा हव्या हे त्यांना सांगाव लागेल. 80-90 जागा मिळाल्या, तर 50-60 निवडून येणार. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी बारामती, शिरुर, रायगड, धाराशिव या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.