ठाकरे चित्रपटाच्या निर्मितीसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा पैसा; स्वप्ना पाटकरांचा राऊतांवर गंभीर आरोप

पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

अजय देशपांडे

|

Sep 21, 2022 | 11:37 AM

मुंबई : पत्राचाळ (Patrachal) प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ठाकरे सिनेमाच्या निर्मितीत पत्राचाळ घोटाळ्याचा पैसा वापरण्यात आल्याचा दावा पाटकर यांनी केला आहे.  तसेच संजय राऊतांनी बेनामी कंपन्यांमध्येही पैसा वळवल्याचा स्वप्ना पाटकरांचा आरोप आहे. 2019 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर ‘ठाकरे’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.  याच चित्रपटासाठी पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा वापरल्याचा आरोप पाटकरांनी केला आहे. दुसरीकडे ईडीकडून देखील संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध होत आहे. त्यामुळे खसादार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें