Eknath Shinde | शंभुराज देसाईंना धक्काबुक्की, शिवसेना- भाजपमध्ये तणाव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घडलेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि आमदारांची विशेष बैठक झाली. साताऱ्यातील घटनेमुळे शिवसेनेचे आमदार संतप्त झाले होते. उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी मंत्र्यांना आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक सहन करण्यासारखी नाही, असे अनेक आमदारांनी बैठक दरम्यान सांगितले.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घडलेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि आमदारांची विशेष बैठक झाली. साताऱ्यातील घटनेमुळे शिवसेनेचे आमदार संतप्त झाले होते. उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी मंत्र्यांना आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक सहन करण्यासारखी नाही, असे अनेक आमदारांनी बैठक दरम्यान सांगितले. तसेच या प्रकरणावरून कोणतीही तडजोड करायची नाही, असा आग्रहही या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला. सातारा झेडपीच्या निवडणुकीची घटना 2 तारखेला पार पडली होती आणि त्याचे परिणाम आज विधानभवनातही दिसून आले. सुरुवातीला सभागृहात तणाव दिसला. शिंदे गटाने तर विधान भवनाच्या पायऱ्यावर जोरदार आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी शिंदे गट अत्यंत आक्रमक झालेला दिसत होता. अखेरीस सर्व आमदार आणि मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेतली. या बैठकीत साताऱ्याच्या मुद्द्यावरून सर्व आमदार संतप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी गटातील धोरणात्मक तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....

