Thackeray Brothers : फडणवीस मुंबईकर नाहीत… ठाकरे बंधूंनी घेरले; भ्रष्टाचार अन् बिनविरोध जागांवरून थेट हल्लाबोल
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे बंधूंनी देवेंद्र फडणवीसांना स्थानिक भूमिपुत्राच्या मुद्द्यावर घेरले. फडणवीस मुंबईकर नसल्याने त्यांना मुंबईच्या समस्या कशा कळणार, असा प्रश्न उपस्थित केला. भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप, बिनविरोध नगरसेवकांवरील टीका आणि ससाणा उपमा यावरूनही राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका मुलाखतीत ठाकरे बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थानिक भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांना मुंबईच्या समस्यांची खरी जाण नसेल, असा सवाल ठाकरे बंधूंनी उपस्थित केला. बाहेरच्या व्यक्तीला मुंबईच्या गरजा कशा कळणार, असेही त्यांचे म्हणणे होते. या मुलाखतीदरम्यान फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीला कन्फ्युजन आणि करप्शनची युती म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंनी फडणवीसांच्या अजित पवारांवरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण करून देत, पुरावे सादर करण्याची मागणी केली. महायुतीने कल्याण-डोंबिवलीमध्ये मिळवलेल्या बिनविरोध जागांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा मतदारांच्या हक्काचे हनन असल्याचे ठाकरे बंधूंनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल

