ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत… पहिली प्रतिक्रिया समोर

ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत… पहिली प्रतिक्रिया समोर

| Updated on: Jun 24, 2026 | 6:23 PM

अलीकडील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गटातील पक्षफुटीची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.

अलीकडील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गटातील पक्षफुटीची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशात ठाकरे गटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटातील नेते म्हणून अरविंद सावंतर यांनी लोकसभा अध्यक्षांची ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ठाकरे गटातील नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात तब्बल ३५ मिनिटे चर्चा झाली. ठाकरे गटाने पाठवलेल्या पत्राच्या संदर्भात ओम बिर्ला यांनी भेटीसाठी बोलवलं होतं. यावेळी फुटीर खासदारांनी अध्यक्षांकडे कोणतं पत्र दिलं याबाबत माहिती द्यावी अशी मागणी केली, तेव्हा त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलूनच ते दाखवता येईल असं सांगितलं. तसेच, त्यांनी कोणत्याही गटाला मान्यता न देता मूळ पक्षालाच महत्त्व देण्याची मागणी केली आहे.

Published on: Jun 24, 2026 6:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us