चेहरा प्रखर अन् तेजस्वी, विष्णुंचा अवतार मोदी…संजय राऊत यांचा भाजपला खोचक टोला
'भ्रष्टाचारांना घेऊन तुम्ही ४०० पार करण्याची तयारी करत असाल, स्वप्न पाहत असाल तर तुमचा स्वप्नभंग होणार आहे. भाजप घाबरलेला आहे. ४०० काय २०० पार करता येत नाही....नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाण यांना भाजपात घ्यावं लागतंय'
शिर्डी, दि. 14 फेब्रुवारी 2024 | मोदी यांच्यावर अनेक छोटे-मोठे रावण घेऊन २०२४ च्या निवडणुका लढवण्याची वेळ आली आहे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर राज तिलक की करो तयारी, आ रहे है हमारे भ्रष्टाचारी… पण हा राज तिलक काय तुम्हाला लागणार नाही, असा भाजपचा नवा नारा असणार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भ्रष्टाचारांना घेऊन तुम्ही ४०० पार करण्याची तयारी करत असाल, स्वप्न पाहत असाल तर तुमचा स्वप्नभंग होणार आहे. भाजप घाबरलेला आहे. ४०० काय २०० पार करता येत नाही….नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाण यांना भाजपात घ्यावं लागतंय, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पुढे राऊत असेही म्हणाले की, मोदींचा चेहरा इतका प्रखर तेजस्वी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णुंचा अवतार आहेत. प्रभू श्रीरामाचं बोट धरून अयोध्येत जाताय…पण शेवटी त्यांनी अनेक छोटे-मोठे रावण घेऊन २०२४ ची लोकसभा जिंकण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी सडकून शाब्दिक वार मोदींवर केलाय.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

