AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस नेत्यांबद्दल बोलून चोमडेगिरी करू नये; काँग्रेस नेत्याने राऊतांना फडकारलं

काँग्रेस नेत्यांबद्दल बोलून चोमडेगिरी करू नये; काँग्रेस नेत्याने राऊतांना फडकारलं

| Updated on: May 03, 2023 | 1:58 PM
Share

राऊत यांनी काग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असले तरिही निर्णय राहूल गांधी घेतात असं म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली दिसत आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केले होते. तसेच राऊत यांनी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतप अजित पवार यांनी राऊत यांना फटकारत दुसऱ्या पक्षाची वकिली घेऊ नका असं सुनावलं होतं. त्यानंतर आता काँग्रसने देखील राऊत यांना चांगलचं फटकारलं आहे. राऊत यांनी काग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असले तरिही निर्णय राहूल गांधी (Rahul Gandhi) घेतात असं म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली दिसत आहे. तर राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल बोलून चोमडेगिरी करू नये, असा थेट इशारा देत राऊत यांना टोला लगावला आहे. त्यामुळे पटोले यांच्या टीकेला आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: May 03, 2023 01:29 PM