Saamana : भाजपचे मुस्लिम प्रेम खरे नसून पुतनामावशीचे; सामनातून भाजपवर टीकास्त्र
कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करायचे, हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करायचा आणि दुसरीकडे सुफी दर्ग्यामध्ये जाऊन 'सुफी संवाद महाअधिवेशन' भरवायचा कार्यक्रम करत असल्याची टीका केली आहे
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर गेल्याने त्यांच्या टीका होत आहे. भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनामधून भाजपचा समाचार घेण्यात आला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेकातून भारतीय जनता पक्षासारखा ढोंगी आणि नौटंकीबाज पक्ष हिंदुस्थानात दुसरा कोणता नसेल असे म्हटलं आहे. तर कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करायचे, हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करायचा आणि दुसरीकडे सुफी दर्ग्यामध्ये जाऊन ‘सुफी संवाद महाअधिवेशन’ भरवायचा कार्यक्रम करत असल्याची टीका केली आहे. भाजपचे हिंदुत्व तर ढोंगी आहेच, पण मुस्लिम प्रेमदेखील मतलबी आहे. मतलब संपला की, त्यांचे लोक पुन्हा मुस्लिमांचे झुंडबळी घ्यायला मोकळे. भाजपचे हे मुस्लिम प्रेम खरे नसून पुतनामावशीचे आहे. हा उमाळा मुस्लिम समाजाविषयी नाही, तर मुस्लिम मतांसाठीचा आहे. तर वीर सावरकरांच्या नावाने यात्रांचे ढोंग करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या आंदोलनातील योगदान नाकारण्याचे पाप त्यांनी केले नसते.
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?

