Thane | …अन्यथा छाटलेल्या झाडांच्या फांद्याचा आहेर देऊ, भाजपचा प्रशासनाला इशारा

ठाण्यात पावसाला सुरुवात होताच झाडे पडण्याचे सत्र सुरु झाले. ज्यात गाड्यांचे नुकसान तर होतेच परंतु अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. काही दिवसांपूर्वीच तलावपाळी येथे चालत्या रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालक आणि एका प्रवाश्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरीही निगरगट्ट पालिकेचे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून झोपेचे सोंग घेऊन बसल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.

ठाण्यात पावसाला सुरुवात होताच झाडे पडण्याचे सत्र सुरु झाले. ज्यात गाड्यांचे नुकसान तर होतेच परंतु अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. काही दिवसांपूर्वीच तलावपाळी येथे चालत्या रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालक आणि एका प्रवाश्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरीही निगरगट्ट पालिकेचे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून झोपेचे सोंग घेऊन बसल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. आज रात्री ठाण्यात नौपाडा भागातील घंटाली परिसरात एका चारचाकी वाहनावर झाड कोसळून गाडीचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु अशा घटनांमुळे पालिकेच्या ढिसाळ कारभाराचे पितळ उघडे पडते असा घणाघाती आरोप भाजप पदाधिकारी महेश मोरे आणि स्थानिकांनी केला आहे. ठाणे महानगरपालिका राज्यातील सर्वात भ्रष्ट पालिका असून झाडांच्या छाटणीच्या टेंडरचे पैसे दिले न गेल्याने ही कामं रखडली असल्यानेच ठाणेकरांना हा त्रास भोगावा लागत आहे असा आरोप त्यांनी केला. पालिकेने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अन्यथा पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना छाटलेल्या झाडांच्या फांद्याचा आहेर देऊ असा इशारा मोरे यांनी दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI