Marathi News Videos The Binni Gate of Torna Fort in Pune Velha Taluka has finally opened after four months

आता दुर्गप्रेमींची प्रतीक्षा संपली, तोरणा गडाच्या संबंधित शिवप्रेमींसह गडप्रेमींना आनंदाची बातमी
VIDEO | गड, किल्ले सर करणाऱ्या शिवप्रेमी आणि गडप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी, बघा व्हिडीओ
पुणे : गड, किल्ले सर करणाऱ्या शिवप्रेमी आणि गडप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील तोरणा गडाच्या बिन्नी दरवाज्याचा मार्ग अखेर चार महिन्यांनंतर सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवार 13 मे पासून तोरणा गडाच्या बिन्नी दरवाज्याचा मार्ग पर्यटकांना खुला करण्यात येणार आहे. तोरणा गडाच्या बिन्नी दरवाजा आणि बुरुज्यांच्या डागडुजीच्या कामाकरता गेल्या चार महिन्यांपासून हा मार्ग पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता. पुरातत्व विभागाकडून तोरणा गडाच्या बिन्नी दरवाजा आणि बुरुज्यांची डागडुजी करण्यात आली आहे. गडावर जाण्यासाठी वेल्हेमार्गे बिन्नी दरवाजा हा प्रमुख मार्ग आहे, त्यामुळं आता पुन्हा हा मार्ग पर्यटकांसाठी खुला होणार असल्याने गडप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे आणि शिवप्रेमींसह गडप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Published on: May 12, 2023 8:52 AM
Related Video
आखाती देश इतके श्रीमंत, पण, कुवैत, कतारसारख्या देशात ट्रेन का नाही ?
आचार्य चाणक्य सांगतात, अशा लोकांच्या मदतीसाठी बिलकूल पुढाकार घेऊ नका
मी पक्ष सोडलाच नाही, सचिन अहिर यांचे धक्कादायक विधान; काय म्हणाले?
FIFA: कॅनडाचा बाद फेरीत इतिहास, द अफ्रिकेला नमवत पहिल्यांदाच असं घडलं
सचिन अहिर फुटताच सुनील शिंदेंनी जे मनात साचलेलं ते बोलून टाकलं
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...