AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ROHIT PAWAR 'मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अध्यक्ष निर्णय घेणार नाही' रोहित पवार यांनी थेट कारणच सांगितले

ROHIT PAWAR ‘मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अध्यक्ष निर्णय घेणार नाही’ रोहित पवार यांनी थेट कारणच सांगितले

| Updated on: Oct 18, 2023 | 6:38 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनता दरबार घेत नाही याचे कारण म्हणजे जनता दरबार घेणे त्यांना परवडणार नाही. कारण त्यांनी जनतेची नाराजी ओढवून घेतली आहे. राष्ट्रवादीसोबत काही नेते होते आणि आता ते भाजपसोबत स्वार्थासाठी गेले. पण, त्याचे पुढे काय होईल ते लवकरच कळेल असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई | 18 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील ( Lalit Patil) याला अटक झाली की काल झाली हा मुद्दा महत्वाचा नाही. ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेसच कारवाई करणं महत्त्वाचं होतं. त्यांच्यासाठी कुणाचा फोन आला होता? याची न्यायालयीन चौकशी होणे गरजेचं आहे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष यांना चपराक लगावली आहे. मात्र, त्याआधीच अध्यक्ष यांनी निर्णय घ्यायला हवा होता. निर्णय घेतला तर भाजप (Bjp) आणि शिंदे गटात वाद निर्माण होईल म्हणून ते निर्णय घेणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. शिंदे गट ही फक्त एक ऍडजस्टमेंट आहे. शिंदे सरकारवर (Shinde Government) आधीच जनतेची नाराजी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून ते आमदारांची नाराजी ओढवून घेणार नाहीत असे ते म्हणाले.

Published on: Oct 18, 2023 06:36 PM