Mumbai | वाहतूक पोलिसाला कारचालकाने बोनेटवरुनच पुढे नेलं, अंधेरीतील धक्कादायक प्रकार

| Updated on: Sep 30, 2021 | 8:41 PM

संबंधित घटना ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे कर्तव्यावर होते.

Follow us on

YouTube video player

मुंबई : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात हा प्रकार घडला. गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलीस बोनेटवर चढला. तर चालकाने देखील संबंधित वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच चालत फरफटत पुढे नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पुढे काही स्थानिकांनी गाडी थांबवत बोनेटवरुन पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवलं. पण त्यानंतर कारचालक कार घेऊन पळून गेला. संबंधित घटना ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार तिथे आली. संबंधित कार चालकाने ही वीरा देसाई रोडकडून जेपी रोडच्या दिशेला उजवे वळण घेतली. पण तिथे त्या मार्गाला नो एन्ट्री होती. पण तरीही कार चालकाने त्या दिशेला गाडी वळवली. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस गुरव यांनी गाडी चालकाला अडवलं.