VIDEO : चिमुकली विजेच्या खांबाला चिकटली, तरुणाने जीवाची बाजी लावून वाचवलं
अंबरनाथमध्ये एक चिमुकली विजेच्या खांबाला चिकटल्याची थरारक घटना घडली. मात्र तरुणाने प्रसंगावधान राखत मुलीला वाचवल्याने सुदैवाने दुर्घटना टळली.
ठाणे : अंबरनाथमध्ये एक चिमुकली विजेच्या खांबाला चिकटल्याची थरारक घटना घडली. मात्र तरुणाने प्रसंगावधान राखत मुलीला वाचवल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. कानसई गावात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला. घरगुती कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. यावेळी गावातीलच एका तरुणाने प्रसंगावधान राखून या चिमुकलीचा जीव वाचवला. (The little girl recued after clung to the electricity pole near Ambarnath Mumbai)
कानसई गाव परिसरात गुरुवारी रात्री एक हळदी समारंभ सुरू होता. यावेळी सिद्धिका भोईर ही लहान मुलगी खेळत असताना अचानक तिचा हात विजेच्या खांबाला लागला आणि ती चिकटून बसली. हा प्रकार पाहून तिथे असलेला वैभव भोईर हा तरुण त्या मुलीच्या दिशेने धावला आणि मुलीची विजेच्या खांबापासून सुटका केली.
यानंतर समारंभासाठी आलेल्या लोकांनीही तिथे धाव घेत सुटकेचा निश्वास टाकला. कानसई गाव परिसरात घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर कानसई गावातून वैभव भोईरच्या धाडसाचं कौतुक केलं जातंय.
VIDEO : चिमुकली खांबाला चिटकली
संबंधित बातम्या
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून बलात्कार, नर्सचा आरोप, मुंबईत गुन्हा
(The little girl rescued after clung to the electricity pole near Ambarnath Mumbai)
Published on: Jun 05, 2021 12:08 PM
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
