बुलढाण्यात एकच चर्चा! पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता?
मंत्री कमी आणि खात्यांचा पदभार अधिक अशी गत अनेक मंत्र्यांची झाली आहे. त्यामुळे कधी येथे तर कधी तेथे असे मंत्र्यांना फिरावं लागतं. त्यामुळे मध्यंतरी कल्याणमध्ये शंभूराज देसाई यांचे पालकमंत्री हरवले असे बॅनर्स लागले होते.
बुलढाणा : राज्यातीस शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने त्याचा परिणाम विविध जिल्ह्यात दिसत आहे. मंत्री कमी आणि खात्यांचा पदभार अधिक अशी गत अनेक मंत्र्यांची झाली आहे. त्यामुळे कधी येथे तर कधी तेथे असे मंत्र्यांना फिरावं लागतं. त्यामुळे मध्यंतरी कल्याणमध्ये शंभूराज देसाई यांचे पालकमंत्री हरवले असे बॅनर्स लागले होते. तर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता अशी थेट तक्रारच पोलीसांत देण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सध्या राज्यात चांगलीच चर्चा होत आहे. तर पोलीसांना काय करावं आणि काय नको असं झालं आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व आल्यापासून ते जिल्ह्यात केवळ तीन वेळा शासकीय कामासाठी आले. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. शेतकरी खचून गेला. पण पालकमंत्री जिल्ह्यात काही आले नाहीत. त्यावरून आता आरोप करत, सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव शहर पोलीस ठाण्यात पालकमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पालकमंत्र्यांना तात्काळ शोधून द्यावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर गुलाबराव पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पहावं लागणार आहे.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

