WITT Global Summit : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हचा दुसरा दिवस, बॉलिवूडचे दिग्गज कलाकार साधणार संवाद
दरवर्षीप्रमाणे यंदाही हे संमेलन होत असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या वर्षाची थीम ‘इंडिया: पोझ्ड फॉर द नेक्स्ट बिग लीप’ अशी आहे. दरम्यान, आजच्या दुसऱ्या दिवशी भारत पे चे चेअरमन आणि एसबीआयचे माजी चेअरमन रजनीश कुमार यांची मुलाखत होणार
नवीदिल्ली, २५ फेब्रुवारी २०२४ : TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ची दुसरी आवृत्ती कालपासून नवी दिल्लीत सुरू झाली आहे. तीन दिवसीय News9 ग्लोबल समिटमध्ये देशासह जगातील बडे नेते आणि प्रतिभावंतांकडून आपली भूमिका, संकल्पना, पर्याय आणि कृती कार्यक्रम मांडला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे संमेलन होत असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या वर्षाची थीम ‘इंडिया: पोझ्ड फॉर द नेक्स्ट बिग लीप’ अशी आहे. दरम्यान, आजच्या दुसऱ्या दिवशी भारत पे चे चेअरमन आणि एसबीआयचे माजी चेअरमन रजनीश कुमार यांची मुलाखत होणार आहे. यासबोतच आज या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही संवाद साधणार आहेत. यावेळी अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता आयुष्यमान खुराणा यावेळी संवाद साधणार आहेत. टीव्ही9 नेटवर्ककडून 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे आणि सत्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्या दिवशी भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी काय स्पेशल असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

