Marathi News Videos There is no rain alert in Nagpur Vidarbha from Sunday, forecast by Meteorological Department

मुसळधार पावसानं हैराण असलेल्या विदर्भकरांसाठी हवामान खात्याकडून दिलासादायक बातमी
VIDEO | विदर्भात रविवारपासून पावसाचा कोणता असणार अलर्ट? हवामान विभागाचा अंदाज काय?
नागपूर, 28 जुलै 2023 | विदर्भात आज आणि उद्या मुसळाधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला होता. त्यानुसार विदर्भात दमदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने हैराण असलेल्या विदर्भकरांसाठी हवामान खात्याकडून एक दिलासादायक बातमी आहे. गेले दोन दिवस मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर आता विदर्भात पाऊस कमी होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भात रविवारपासून पावसाचा कुठलाही अलर्ट नाही. त्यामुळे ३० जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपुरात परवा १६४ मीमी पाऊस पडला हा दहा वर्षांतलं दुसरा रेकॅार्ड असल्याची नोंद ही करण्यात आली आहे.
Published on: Jul 28, 2023 4:06 PM
Related Video
हे पाळलेले उंदीर.., हॉटेल मॅनेजरचं उत्तर ऐकून तुकाराम मुंढेही चक्रावले
एका साडीने वाचवले 21 लोकांचे प्राण, नेपाळच्या महापूरात ठरली 'देवदूत'
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
SIRच्या यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; नेत्याच्या दाव्याने खळबळ
5 महिन्यात बादशाहचा दुसरा संसार मोडला, पोटगी म्हणून किती रुपये दिले?
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार