Special Report | तिसरी आघाडी बनण्याआधी बिघाडी?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नव्हती. भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नव्हता. देशात अनेक मुद्दे आहेत. (yashwant sinha)

Special Report | तिसरी आघाडी बनण्याआधी बिघाडी?
| Updated on: Jun 22, 2021 | 9:04 PM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नव्हती. भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नव्हता. देशात अनेक मुद्दे आहेत. पण व्हिजन नाही. देशाला व्हिजन देण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही देशाला व्हिजन देऊ, असा दावा राष्ट्रमंचच्या नेत्यांनी केला आहे. (Third Front | it Wasn not Political meeting, Says yashwant sinha After 8 Parties Meet At Sharad Pawar House)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची अडीच तास बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अॅड. माजिद मेमन, पवन वर्मा आणि समाजवादी पार्टीचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला माहिती दिली. आजची बैठक ही मोदी किंवा भाजपविरोधातील नव्हती. पवारांच्या घरी बैठक झाली, पण पवारांनी बैठक बोलावली नव्हती. ही राष्ट्रमंचची बैठक होती. आम्ही त्याचे सदस्य म्हणून त्यात सहभागी झालो होतो, असं माजिद मेमन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.

काँग्रेसला एकटं पाडलं नाही

पवार तिसरी आघाडी करत असून काँग्रेसला एकटं पाडलं जात आहे, अशी चर्चा आहे. तीही चुकीची आहे. या बैठकीला काँग्रेसच्या पाच खासदारांना आमंत्रण दिलं होतं. कपिल सिब्बल, शत्रुघ्न सिन्हा आणि अभिषेक मनू सिंघवी यांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे काँग्रेसने बहिष्कार टाकला किंवा काँग्रेसला एकटं पाडलं या वृत्तात काही तथ्य नाही, असं सांगतानाच देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावरही चर्चा झाली. ही राजकीय बैठक नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अल्टरनेट व्हिजन तयार करणार

आजच्या बैठकीत अल्टरनेट व्हिजन तयार करण्यावर चर्चा झाली. यशवंत सिन्हा हे टीम स्थापन करून प्रत्येक मुद्द्यावर देशाला मजबूत व्हिजन देतील. तरुणांमध्ये व्हिजनचा अभाव असून नये यासाठी हा प्रयत्न असणार आहे. अर्थकारण, बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ आदींबाबत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील टीम देशाला व्हिजन देणार असल्याचं घनश्याम तिवारी यांनी स्पष्ट केलं.

पवारांनी पत्रकार परिषद टाळली?

पवारांच्या निवासस्थानी अडीच तास बैठक झाली. तोपर्यंत मीडियाचे प्रतिनिधी पवारांच्या घराबाहेर उभे होते. या बैठकीनंतर पवार मीडियासमोर येतील असं वाटत होतं. मात्र, पवारांनी मीडियासमोर येणं टाळलं. तर यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक करून अधिक बोलण्यास नकार देऊन पत्रकार परिषदेतून अंग काढून घेतलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पवार मीडियाला सामोरे गेले असते तर त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत दोन वेळा झालेली बैठक आदी प्रश्न विचारले गेले असते. मात्र, त्यांनी मीडियासमोर येणं टाळलं. या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठीच पवारांनी मीडियासमोर येणं टाळलं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या:

LIVE : शरद पवारांच्या घरी विरोधक एकवटले, ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीकडे देशाचं लक्ष

पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल गैरलागू, तिसरी-चौथी आघाडी भाजपला आव्हान देईल असं वाटत नाही; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

(Third Front | it Wasn not Political meeting, Says yashwant sinha After 8 Parties Meet At Sharad Pawar House)

Follow us
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....