AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsainik on Cycle | निष्ठा व्यक्त करण्यासाठी तो थेट सायकलवरुन मातोश्रीवर, अहमदनगरच्या शिवसैनिकाचे असे ही प्रेम

Shivsainik on Cycle | निष्ठा व्यक्त करण्यासाठी तो थेट सायकलवरुन मातोश्रीवर, अहमदनगरच्या शिवसैनिकाचे असे ही प्रेम

| Updated on: Jul 25, 2022 | 4:13 PM
Share

Shivsainik on Cycle | आपली पक्षावरची, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावरची निष्ठा व्यक्त करण्यासाठी एक शिवसैनिक चक्क सायकलवरुन मातोश्रीवर दाखल झाला.

Shivsainik on Cycle | शिवसेनेची (Shivsena) पाळंमूळं किती खोलवर रुजली आहे आणि तळागाळातील शिवसैनिक शिवसेना, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray), उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांच्यावर किती निष्ठेने प्रेम करतो, याचा प्रत्यय आज मातोश्री बाहेर आलेल्या शिवसैनिकाने दिला. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जामखेड येथील एक तरुण शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी थेट सायकलवरुन मुंबईत (Mumbai to visit) मातोश्रीवर दाखल झाला. विशेष म्हणजे एवढा लांबचा पल्ला त्याने एकट्याने सायकलवर पार केले. पावसाचा, गारठ्याचा विचार न करता शिवसैनिक शिवसेनेवर किती प्रेम करतो हे यातून दिसून आले. आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांना झालेले दुख बघवले नाही. त्यामुळे तो उद्धव ठाकरे यांना नगर जिल्हयातील जामखेड येथून भेटायला आल्याचे त्याने यावेळी सांगितले. आमदार जरी बाहेर पडले तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यासाठी हा तरुण सायकलवरती इतका दूरचा प्रवास करत आला.