Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |

पुण्यातील आपलं खडकवासला या सेल्फी पॉइंटची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. मुख्य म्हणजे कालच खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

1) यंदाची वारी साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नव्या निर्णयामुळे मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी आर्थिक संकटाला समोरे जावे लागणार अशा सब्दात व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

2) पुण्यातील आपलं खडकवासला या सेल्फी पॉइंटची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. मुख्य म्हणजे कालच खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले होते.

3) सोलापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत समान निधीवाटपावरून काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.

4) मुंबईत सायन-पनवेल महामार्गावर बांधकाम सुरु असून येते वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

5) पालघर जिल्ह्यात निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिक पुन्हा एकदा गर्दी करु लागले आहेत.