संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे कोणता गेम आखत आहेत? पहा काय आहे प्लॅन टॉप 9 न्यूजमध्ये

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 15, 2022 | 8:32 PM

मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटात माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधणार आहेत. तर यानंतर उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्या मतदार संघात सभा घेणार आहेत.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर भेट झाली. यावेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. यावेळी ठाकरे-शिंदेंमध्ये राज्यातील सध्य राजकीय घडामोडींसह अंधेरी पोटनिवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला असे गायकवाड म्हणाले. तर बाळासाहेब असतानाच उद्धव ठाकरे यांनी कार्याध्यक्ष होण्यासाठी खेळी केल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकार अस्थिर असल्याचे भाकीत केले. त्यांच्या या भाकीतानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उत्तर दिलं आहे. तसेच आमच्या सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नाही. आमचं सरकार राज्यात पुन्हा येईल असंही फडणवीस म्हणाले. तर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ढाल-तलवार चिन्हावर आता शीख बांधवानी आक्षेप घेतला आहे. यादरम्यान मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटात माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधणार आहेत. तर यानंतर उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्या मतदार संघात सभा घेणार आहेत.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI