पोटनिवडणूक आणि ठाकरे-शिंदे गटात घमासान. पहा नव्या अपडेट टॉप 9 न्यूजमध्ये
राजीनामा हातात मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल या चिन्हावरच ही निवडणूक लढवणार असल्याचे लटके यांनी म्हटलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना आज उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तसेच न्यायालयाने बीएमसीला झटकाही दिला. तसेच उद्या सकाळी 11 पर्यंत लटकेंचा राजीनामा स्विकारा असे आदेश दिला आहे. दरम्यान राजीनामा हातात मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल या चिन्हावरच ही निवडणूक लढवणार असल्याचे लटके यांनी म्हटलं आहे. तर लटकेंबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खोके सरकार लोकशाहीला घातक असल्याचं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच ठाकरे गटाचा हा रडीचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच राजीनाम्याची प्रक्रीया ही वेळेत सुरू केली असती तर ठाकरेंवर ही वेळ आली नसती असेही म्हस्के यांनी म्हटलं आहे.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

