Solapur | उजनी धरणक्षेत्रात पर्यटनस्थळ विकसित होणार

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात असलेल्या पाच एकर जमिनीवर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. पक्षीनिरीक्षणासह, बोटिंग आणि मनोरंजनाची यंत्रणाही उभी करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाला सोलापूर जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्त्व असून माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या धरणाला यशवंत सागर या नावानेही संबोधले जाते.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात असलेल्या पाच एकर जमिनीवर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. पक्षीनिरीक्षणासह, बोटिंग आणि मनोरंजनाची यंत्रणाही उभी करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाला सोलापूर जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्त्व असून माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या धरणाला यशवंत सागर या नावानेही संबोधले जाते. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र वाढण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केला जाणार आहे शिवाय उजनी धरणात दरवर्षी येणाऱ्या परदेशी पक्षांची ओळख आणि त्यांचे महत्त्व समजण्यासाठी अभ्यास केंद्र आणि पक्षी निरीक्षण केंद्र उभारले जाणार आहे. उजनी धरणासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनीपैकी त्रेचाळीस हेक्टर जमीन अद्यापही शिल्लक आहे त्या जागेवर पर्यटन क्षेत्र उभारण्यात येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI