Breaking | आबुधाबी विमानतळाजवळ हल्ल्यात 2 भारतीयांचा मृत्यू

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही तेल टँकरचा सगळ्यात आधी मुसाफा भागात स्फोट झाला. यानंतर अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Abu Dhabi International Airport) नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागली. दरम्यान, यात विमानतळाचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त अजून तरी हाती आलेलं नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 17, 2022 | 7:43 PM

यूएईमध्ये (UAE) एका भीषण हल्ल्यात 3 तेल टँकरचा स्फोट झाला आहे. या हल्ल्यात दोन भारतीयांसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. येमेनच्या हाऊथी बंडखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिली आहे. या हल्ल्यानंतर भीषण आग लागली असून ड्रोन हल्ला होण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. सौदी अरेबियानंतर आता येमेनच्या हाऊथी अतिरेक्यांनी आता यूएईवर हल्ला केल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. तीन मृतांपैकी एका दोघे भारतीय असून एक पाकिस्तानी नागरीक असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर सहा जण जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही तेल टँकरचा सगळ्यात आधी मुसाफा भागात स्फोट झाला. यानंतर अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Abu Dhabi International Airport) नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागली. दरम्यान, यात विमानतळाचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त अजून तरी हाती आलेलं नाही. इराणच्या समर्थनात असलेल्या बंडखोरांनी हा हल्ला केला असल्याची कबुली दिली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें