Vinayak Raut : उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेण्याच्या तयारीत, ठाकरेंच्या बड्या खासदारांचा मोठा दावा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख नेते विनायक राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केलंय. याआधी 20 आमदारांचा गट तयार करून उपमुख्यमंत्री मिळवण्याचे प्रयत्न केले होते, असाही मोठा दावा करत विनायक राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर हा खळबळजनक आरोप केलाय.
टीव्ही ९ मराठीशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, दिल्ली दौऱ्यामागे राजकारण तर 100 टक्के आहे. आता एकनाथ शिंदे यांची जागा उदय सामंत हे घेण्याच्या तयारीत आहेत. आत्ताच नव्हे याआधीही दिल्लीचे दौरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उदय सामंतांनी अनेक वेळा केले होते. इतकंच नाहीतर विनायक राऊत यांनी सामंतांवर आरोप करताना असंही म्हटलं की मुख्यमंत्री पदावरून शिंदे रागावून बसले त्यावेळेला उदय सामंतांनी त्यांच्या पक्षातल्या 20 आमदारांचा गट तयार करून उपमुख्यमंत्रीपद ताब्यात घ्यायचे प्रयत्न केले होते.त्यामुळे एकनाथ शिंदेंना आता दिल्लीवारी करणं यापुढे करणं डोईजड जाणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

