Thackeray Brothers : भावासाठी राज ठाकरेंनी केलं असं काही, सगळ्यांचं लक्ष वेधलं
Raj-Udhav Thackeray : ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच आता ठाकरे बंधूंचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा हिंदी सक्ती विरोधातला एकत्र मोर्चा हा युतीचं निमित्त म्हणून बघितला जात असतानाच आता ठाकरे बंधूंकडून याच युतीच्या दिशेने आणखी एक पाऊल उचललं गेलं आहे का? असा प्रश्न पडण्यासारखा खास प्रसंग आज या दोन्ही भावांमध्ये बघायला मिळाला आहे. उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला रस्ता देण्यासाठी राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवलेला दिसून आला आहे. त्यामुळे या दृश्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. आज उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ समोरून जात असताना तिथे राज ठाकरेंचाही ताफा आला. त्यामुळे या दोन्ही भावांचा ताफा हा आजूबाजुने गेलेला दिसून आला. यावेळी राज ठाकरेंच्या ताफ्याच्या गाड्यांचा वेग देखील काहीसा कमी झालेला बघायला मिळाला.
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच ठाकरे बंधु एकमेकांच्या समोर अशा प्रकारे आल्याने या दृश्याकडे सगळ्यांचं लक्ष वेढलं गेलं आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

